चोखोबा ते तुकोबा समता वारीचे देहूकडे प्रस्थान

 चोखोबा ते तुकोबा समता वारीचे देहूकडे प्रस्थान

पंढरपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजामध्ये समता, बंधुता आणि मानवता हे अधिक वृद्धिंगत व्हावे. यासाठी मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या पावन भूमीपासून संत तुकाराम महाराजांच्या देहू गावपर्यंत चोखोबा ते तुकोबा ही समतेची वारी निघाली आहे. चोखोबा ते तुकोबा या समतेच्या वारीचे नुकतेच पंढरपुरातून देहूकडे प्रस्थान झाले.

मंगळवेढा- पंढरपूर ते देहू असा 9 जिल्ह्यातून जाणाऱ्या समतेच्या वारीमध्ये ठिकठिकाणी समता ,बंधुता, लोकशाही अन संत विचार याचे प्रबोधन व जागृती पर कार्यक्रम होणार आहेत. साधारणपणे 12 जानेवारी पर्यंत ही समतेची वारी श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी जाऊन पोहोचेल. याच दिंडीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे , दिलीप धोत्रे , सुनील सर्वगोड , प्रणव परिचारक याच्या उपस्थितीत प्रस्थान झाले. संत चोखामेळा अध्यासन केंद्र यांच्या वतीने चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ML/KA/SL

2 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *