जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत भीषण स्फोट, १७ जखमी, दोघांचा मृत्यू ..

 जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत भीषण स्फोट, १७ जखमी, दोघांचा मृत्यू ..

नाशिक दि १- : नवीन वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये भीषण अपघात झाला. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल कंपनीत आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण स्फोट झाला, यामुळे कंपनीला आग लागली आणि त्यात चौदा कामगार जखमी झाले आहेत.

या आगीने भीषण रूप धारण केले. या आगीच्या ज्वाला हवेत उंच पसरल्या , बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, जिंदाल ग्रुपच्या पॉलिफिल्म या बांधकाम कंपनीच्या बॉयलरचा यापूर्वी स्फोट होऊन आग लागली होती, या आगीत काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत, काही कर्मचारी आत अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण अग्निशमन दलाचे जवान आणि नाशिक अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

गंभीर जखमींना नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी बचावकार्य सुरू असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीत कंपनीत काम करणारे 17 कर्मचारी गंभीर भाजले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे अजूनही लहान-मोठे स्फोट होत आहेत

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर,

जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप आदिमसह प्रशासनातील सर्व अधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून आहेत. कंपनीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची ही मदत घेण्यात येत आहे.

घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

ML/KA/SL

1 Jan.2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *