सेन्सेक्स-निफ्टीत सलग सातव्या वर्षी वाढ, 2022 मध्ये मार्केटने दिले 4.5% रिटर्न

 सेन्सेक्स-निफ्टीत सलग सातव्या वर्षी वाढ, 2022 मध्ये मार्केटने दिले 4.5% रिटर्न

मुंबई, दि. ३१ (जितेश सावंत) : २०२२ या वर्षाच्या शेवटच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली पण 30 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात (2022 चा शेवटचा आठवडा) तीन आठवड्यांचा विक्रीचा सिलसिला तोडून बाजार 1 टक्क्यांहून अधिक वाढला.

२०२२ हे वर्ष भारतीय बाजारासाठी अत्यंत चढउताराचे ठरले. रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई आणि व्याजदर आणि चीनमध्ये कोविडच्या संदर्भात आखलेली कडक नीती.असे असून देखील सेन्सेक्समध्ये 4.5 टक्के व निफ्टीत 4.33 टक्के वाढ झाली. सेन्सेक्स-निफ्टी सलग सातव्या वर्षी वाढले. निफ्टी बँक 22% आणि मिडकॅप निर्देशांक 4% च्या वाढीसह बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सुमारे 70% वाढ झाली. मेटल आणि CPSE निर्देशांक प्रत्येकी 20% वाढले. तथापि, निफ्टी आयटी निर्देशांक जवळपास 25% ने घसरला,वार्षिक आधारावर 2008 नंतरची सर्वात मोठी घसरण ठरली. फार्मा निर्देशांकात देखील 6 वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली परंतु 34 निफ्टी समभागांनी यावर्षी सकारात्मक परतावा दिला. 2022 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया 10.18% घसरला – 2013 नंतरचा उच्चांक.

२०२३ मधील बाजाराकरिता महत्वाच्या गोष्टी
जागतिक व्याजदर वाढ, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अगोदर जाहीर होणारे पूर्ण बजेट, ९ राजांच्या विधानसभा निवडणुका,अमेरिकेची अर्थव्यवस्था(मंदीची सुरुवात होणार का नाही ?),रशिया -युक्रेन तसेच चीन व तैवान मधील तणाव.
2023 मध्ये चीनची अर्थव्यवस्था खुली झाल्याने आणि ओपेकने उत्पादनात कपात केल्यामुळे, जागतिक क्रूडचा वापर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे.पर्यायाने क्रूडचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
2023 मध्ये सोन्याचा भाव 62,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Technical view on nifty- मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने 18,100 चा स्तर अलगदपणे पार केला व 18265 चा स्तर गाठला. शुक्रवारी निफ्टीने 18105 चा बंद दिला.वर जाण्याकरिता निफ्टीने हे 18245-18265-18325-18340 हे स्तर पार करणे आवश्यक आहे.तसेच निफ्टीला 18,100 हा स्तर राखणे जरुरी आहे अन्यथा निफ्टी 18080-17992-17969-17838 ही खालची पातळी गाठू शकते.

बाजार पुन्हा उसळी घेतली.सेन्सेक्स ७२१ अंकांनी वधारला.Market bounces back, Sensex gains 721 pts
२०२२ या वर्षांतील शेवटच्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी बाजारात तुफान तेजी पाहावयास मिळाली. चार दिवसांच्या बाजारातील घसरणीला ब्रेक लागला.शेअर बाजारात सांताक्लॉजची रॅली पाहायला मिळाली.जागतिक बाजारातील सकारात्मकता तसेच मार्केट ओव्हरसोल्ड असल्याने खालच्या स्तरावरून झालेले बाईंग यामुळे सेन्सेक्स ९०० अंकांपेक्षा जास्त वधारला.फार्मा वगळता बहुतेक क्षेत्रांमध्ये खरेदी झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 721अंकांनी वधारून 60,566 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 207 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,014 चा बंद दिला.
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी.
अत्यंत सकारात्मक सुरुवातीनंतर बाजारात नफावसुली झाली व बाजार काहीसा घसरला परंतु दुपारनंतर खरेदीमुळे मार्केट दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचले. जागतिक बाजारातील भक्कम पाठिंब्याने, देशांतर्गत बाजार मागील आठवड्यातील तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करताना दिसला.कोविड निर्बंध शिथिल केल्याच्या वृत्तामुळे चीनमध्ये मागणी पुनरुज्जीवित्त होईल या आशेने मेटल स्टॉक्स चांगलेच वधारले.बाजार सलग दुसऱ्या दिवशी वधारला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 361अंकांनी वधारून 60,927 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 117 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,132 चा बंद दिला.
बाजाराचा सपाट बंद.Market ends flat
सलग दोन सत्रे वाढल्यानंतर ,संमिश्र जागतिक संकेत आणि गुरुवारी होणारी F&O एक्सपायरीच्या पार्श्वभूमीवर बाजार काहीसा सपाट राहिला व गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा-वसुलीमुळे बाजार किरकोळ तोट्यासह बंद झाला.सेन्सेक्स मधील भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा मोटर्स या कंपन्यांचे नुकसान झाले.दुसरीकडे, लाभधारकांमध्ये टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड आणि मारुती यांचा समावेश होता. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 17अंकांनी घसरून 60,910 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 9 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,122 चा बंद दिला.
सेन्सेक्स २२४ अंकांनी वधारला. Sensex gains 224 points
कमकुवत जागतिक संकेतांमुळे ,देशांतर्गत निर्देशांक नकारात्मक नोटवर उघडले आणि पुढे विक्री वाढतच गेली दिवसाचा बराच काळ बाजार नकारात्मक क्षेत्रात होते. परंतु शेवटच्या तासात झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजार सावरला व सकारात्मक नोटवर बंद झाला.एक्सपायरीच्या दिवशी इक्विटी मार्केटने ऊर्जा, तेल आणि वायू, बँक आणि धातू या क्षेत्रातील खरेदीच्या जोरावर दिवसाच्या नीचांकी बिंदूपासून दिवसाच्या उच्च पातळीच्या जवळ एक स्मार्ट रिकव्हरी नोंदवली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 223 अंकांनी वधारून 61,133 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 68 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,191 चा बंद दिला.
वर्षाच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात घसरण
सकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर बाजाराने जानेवारी सिरीजची सुरुवात सकारात्मकतेने केली परंतु शेवटच्या तासातील नफावसुलीमुळे बाजाराने सकाळचा नफा पुसून टाकला व कॅलेंडर वर्ष 2022 चा शेवटचा ट्रेडिंग दिवस अस्थिरतेमुळे नकारात्मक नोटवर संपवला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 293 अंकांनी घसरून 60,840 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 85 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,105 चा बंद दिला.

(लेखक शेअरबाजार तज्ज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत ) jiteshsawant33@gmail.com)

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *