पाकीस्तानात हिंदू महिलेची निर्घृण हत्या
मुंबई,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकीस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांंच्या घटना वारंवार समोर येत असतात. तशात आता एका हिंदू महिलेची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या झाल्याची भीषण घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील सिंझोरो शहरात एका हिंदू महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
४० वर्षीय महिलेचा शिरच्छेद करण्यात आला. आरोपींनी महिलेच्या शरिरावरील कातडीही सोलली आणि शिरच्छेद केला. महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना केली आहे. इतकंच नाही तर तिचे स्तनही कापून टाकण्यात आले असल्याची माहिती कृष्णा कुमारी यांनी दिली आहे. कृष्णा कुमारी या पाकिस्तानमधील पहिल्या महिला हिंदू खासदार आहेत.
पाकिस्तानच्या एकूण 220 दशलक्ष लोकसंख्येमध्ये केवळ 4 टक्के लोक अल्पसंख्याक आहेत. पाकिस्तानच्या 2017 च्या जनगणनेनुसार देशात 3.5 दशलक्ष हिंदू आणि 25 लाख ख्रिश्चन राहतात. पाकिस्तानमध्ये हिंदूंना मारहाण आणि मंदिरांची तोडफोड केल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. हिंदू मुलींना बळजबरीने पळवून नेले जाते आणि त्यांचे लग्न लावून त्यांचे धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते.
SL/KA/SL
29 Dec. 2022