राष्ट्र पुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही
नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाचे महापुरुष आणि युग पुरुष शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या उच्च पदावरील व्यक्ती आणि मंत्र्यांना पदावरून दूर करण्याची कारवाई धमक दाखवा असं आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत दिलं , विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या कायदा सुव्यवस्था आणि इतर विषयांवरील चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते.
मंत्रिमंडळातील मंत्री महा पुरुषांबद्दल , महिलांबाबत काहीही बोलतात , काही आमदार मतदारांना , अधिकाऱ्यांना धमकावतात हे अजिबात योग्य नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली , राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार, चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटील, मंगलप्रभात लोढा आदींची नावे घेत त्यांनी त्यांची वक्तव्यं सभागृहात सांगितली .
पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करत आहेत, काही जण पोलिसांसमोर गोळीबार करतात याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यानी घ्यावी , जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होण्याचे प्रकार हाणून पाडा अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.
अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांचा कोणताही गुन्हा नसताना त्यांच्यावर कारवाई केली जात आहे, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे, सत्तेचा गैरवापर आम्ही चालू देणार नाही, यापुढे कोणत्याही महा पुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा पवार यांनी आपल्या भाषणात दिला.
ML/KA/SL
29 Dec. 2022