विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा

 विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा

नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भाच्या सर्वंकष विकासासाठी फक्त घोषणा नको तर कृती होण्याची गरज आहे, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व विदर्भावर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा असे प्रतिपादन विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विदर्भातील अनुशेषावर भाषण करताना केले.

विदर्भ मराठवाड्याचा सातत्याने असणारा अनुशेष यावर चर्चा करत असतांना विदर्भाकडे होणारे दुर्लक्ष दूर व्हावे व विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरून निघावा अशी भूमिका दानवे यांनी मांडली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पीक विमा कंपन्यांची दादागिरी, विदर्भाचा अनुशेष भरून न निघणे यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात विदर्भात देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांसारख्या नेत्यांचे नेतृत्व असताना त्यांनी भाषण करण्याऐवजी ऐवजी कृती करावी. विदर्भावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी दानवे यांनी केली.

महाराष्ट्रातील एकूण उद्योगांपैकी केवळ ७ टक्के उद्योग हे विदर्भाकडे आले. येणाऱ्या काळात विकास कसा होईल यावर सरकारने काम करणे गरजेचे आहे. राज्यात २९ लाख ३८ हजार कामगारांपैकी विदर्भात फक्त २ लाख ३८ हजार कामगार हे कार्यरत आहेत.

एकट्या मुंबईत ५३२ आयटी पार्क असून संभाजी नगर मध्ये ३ व नागपूरमध्ये ५ असे एकूण फक्त ८ आयटी पार्क आहेत. आपल्याकडे पायाभूत सुविधा असतानाही केवळ विदर्भ मराठवाड्यात काम करण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यकता असल्याचे दानवे म्हणाले.

ML/KA/SL

29 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *