मुंबई ही महाराष्ट्राचीच
नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई ही महाराष्ट्राचीच असून कोणाच्याही बापाची नाही , मुंबईवर दावा खपवून घेतला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
कर्नाटक विधिमंडळात अशा प्रकारचा दावा झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्याचा तीव्र निषेध करण्याची मागणी करण्याची मागणी त्यांनी केली होती , त्यात मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी तिथे करण्यात आली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अशा बोलघेवड्याना तंबी देण्याची मागणी केली जाईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. कर्नाटकचे दावे चुकीचे आहेत, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे झालेल्या बैठकीतील निर्णयांचे उल्लंघन केलं आहे याची जाणीव ही या पत्रात करून देण्यात येईल असं ते म्हणाले.
ML/KA/SL
28 Dec. 2022