विधान भवनावर अनेक मोर्चांची धडक
नागपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी दरवर्षी अधिवेशनाच्या दरम्यान विविध संघटनेच्या माध्यमातून मोर्चे काढले जातात काही संघटनांच्या मागण्या मान्य होतात तर काही संघटनांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे पुन्हा नव्या जोमाने मोर्चा काढत असतात.
नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात विविध संघटनाच्या माध्यमातून मोर्चे काढण्यात आलेले होते. लक्षवेधी ठरले ते महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, विदर्भ पटवारी संघ नागपूरच्या वतीने जुनी पेन्शनचे सर्व लाभ लागू करण्यात यावे आणि वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चे.
महाराष्ट्र राज्यातील एक नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त तलाठी मंडळ/ अधिकारी सवर्गासह सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचे लाभ लागू करण्यात यावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलेला होता. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ पोषण ट्रॅकर व ग्रॅज्युएटी बाबत न्यायालयाचे आदेशाचे पालन व अन्य मागण्यासाठी आज नागपुरात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला होता तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात ईशारा मोर्चा काढण्यात आलेला होता या सर्व मोर्चाना मॉरिस कॉलेज टी पॉइंट येथे अडविण्यात आलेले होते.
अनुसूचित जाती व जमाती तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. समता प्रतिष्ठान मधील घोटाळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अन्य मागण्यासाठी इशारा मोर्चा काढण्यात आलेला होता. प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालयात सिकलसेल रुग्णाकरिता 30 बेडच्या स्वतंत्र वार्डाची व 24 तास सेवा देणारी यंत्रना निर्माण करण्यात यावी. दिव्यांग प्रमाणपत्र होण्याकरता शासनाच्या जाचक अटीत रद्द करून कायमस्वरूपी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला होता .
महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या अपंग १२३ शाळा व कर्मशाळा यातील कर्मचारी यांना 50 टक्के वेतानावरून शंभर टक्के वेतन लागू तात्काळ लागू करण्यात यावे. कंत्राटी कर्मचारी यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या मागणीसाठी दिव्यांग अपंग शाळा व कर्मशाळा कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला होता.
ML/KA/SL
27 Dec. 2022