मंत्री अब्दुल सत्तार प्रकरणी विधानसभा कामकाज स्थागित

 मंत्री अब्दुल सत्तार प्रकरणी विधानसभा कामकाज स्थागित

नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या सिल्लोड कृषी प्रदर्शनात कोट्यावधी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न आणि राज्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयावर उच्च न्यायालयाने झाडलेले ताशेरे यामुळे गदारोळ होऊन विधानसभा दिवसभरासठी स्थगित झाली.  Assembly work adjourned due to minister Abdul Sattar

सत्तार यांच्या बाबतचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली , सत्तार हेमहिलांना अपशब्द वापरून त्यांचा अवमान करतात , ते महसूल विभागाचे राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन त्यांनी खासगी व्यक्तीला देऊन दीडशे कोटींचा घोटाळा केला आहे, उच्च न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत,त्यामुळे त्यांचा राजीनामा तातडीने घ्यावा अथवा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीपवार यांनी विधानसभेत केली.

नियम ५७ ची नोटीस देत ही मागणी केली , सत्तार यांच्यावर गुन्हाही दाखल करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी केली. आता त्यांना तातडीने पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली

विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपाबद्दल खुलासा मंत्री महोदय करतील , सत्तार यांनी दिलेल्या निर्णयावर न्यायालयात आव्हान देण्यात आलं असेल त्याची माहिती घेऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आपल्या काळातील एका मंत्र्यावर ही असेच ताशेरे होते मात्र कारवाई झाली नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सांगितले, याबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करू असे त्यांनी सांगितले.

मात्र विरोधक आक्रमक झाले , सत्तारांचा राजीनामा मागत जागा सोडून पुढे आले, घोषणाबाजी सुरू झाली, सर्व कामकाज बाजूला ठेऊन चर्चा करण्याची मागणी
तरीही गदारोळात लक्षवेधी सूचना चर्चा अध्यक्षांनी सुरू केली ,एकाबाजूला काही विरोधी सदस्य गदारोळ करत होते तर दुसरीकडे त्यांच्यातील काही चर्चेत भाग घेऊन प्रश्न विचारत होते. यातच अध्यक्षांनी सभागृह आधी अर्धा तास आणि नंतर प्रत्येकी पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले, गदारोळ सुरूच राहिल्याने अखेर ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

ML/KA/PGB
26 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *