विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत दोन्ही बाजूच्या सदस्यांची घोषणाबाजी…
नागपूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी आज सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके अशा घोषणा विरोधी सदस्यांनी दिल्या तर दाऊदच्या सहकाऱ्यांना मदत करणाऱ्या युवा नेत्यावर कारवाई करा , देश के गद्दारोंको जुते मारो सालोंको अशा घोषणा सत्तारूढ बाजूने दिल्या गेल्या.
हिवाळी अधिवेशनाचा आजचा कामकाजाचा सहावा दिवस असून महाविकास आघाडी आणि सत्तारूढ आमदारांनी शेजारी शेजारी उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली , त्याचा मोठा ताण सुरक्षा रक्षकांवर आला होता.
ML/KA/SL
26 Dec. 2022