आता चंद्रावर उगवणार झाड

 आता चंद्रावर उगवणार झाड

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रावर मानवी वसाहत उभारण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ शर्थीचे प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून 2025 पर्यंत चंद्राच्या मातीत झाडे आणि हिरवळ रुजवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी चंद्रावर वनस्पती उगवण्याचा उपक्रमाचा आराखडा तयार केला आहे.

चंद्राचे तापमान दिवसा 107 अंश सेल्सियस तर रात्रीचे तापमान 144 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. तसेच येथील मातीतील घटक देखील पृथ्वीपेक्षा खूप वेगळे आहेत. या वातावरणात वनस्पती उगवणे अशक्य मानले जात आहे. मात्र आता शास्त्रज्ञ हे अशक्य शक्य करण्यासाठी मेहनत घेत आहे. इस्राएली मिशन अंतर्गत बेरेशिट २ हे अंतराळयान चंद्रावर काही वनस्पतींच्या बिया घेऊन जाणार आहे. हे यान पोहोचल्यावर या बिया एका बंद चेंबरमध्ये ठेवण्यात येतील. नंतर चंद्रावरील मातीमध्ये या बिया रुजवल्या जाणार आहेत आणि त्यांना पाणी दिले जाणार आहे.

चंद्रावरील प्रतिकुल परिस्थितीत रोप उगवते का? तग धरते का याचे निरिक्षण केले जाईल. या प्रयोग यशस्वी झाल्यास चंद्रावर ऑक्सिजन आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि चंद्रावरील मानवी वसाहत करण्यासाठीच्या संशोधनात याचा उपयोग होईल.

या आधी अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाने चंद्रावरील माती पृथ्वीवर आणून त्यामध्ये वनस्पती उगवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.

SL/KA/SL

25 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *