अवकाळी पावसामुळे काजू पीक अडचणीत
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे काजूच्या पिकावर मोठा दुष्परिणाम झाला आहे. पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर काळपट पडला आहेत. तर काही ठिकाणी नुकतेच धरु लागलेले काजू बी काळवंडले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फारसा फटका बसला नसला तरीही गेल्या पंधरवड्यातील सततच्या ढगाळ हवामानांमुळे येथील काजू पीकाला देखील फटका बसला आहे.
कोकणात साधारण नोव्हेंबर महिन्यात काजूला पहिल्या बहरातील मोहोर धरण्यास सुरुवात होते. यावर्षी पाऊस लांबल्याने पहिल्या बहराचा मोहोर धरण्याचा कालावधी देखील साधारणपणे 15 दिवसांनी लांबला होता. पहिल्या आलेल्या मोहोरातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र आता या पहिल्या बहाराला नुकसान पोहोचल्याने शेतकरी आता दुसऱ्या बहाराच्या प्रतिक्षेत असून त्यादृष्टीने झाडांवर औषधांची फवारणी आणि अन्य कामे सुरू आहेत.
SL/KA/SL
25 Dec. 2022