कोविडच्या भीतीने शेअर बाजार हादरला

 कोविडच्या भीतीने शेअर बाजार हादरला

मुंबई, दि. 24 (जितेश सावंत ):   शेअर बाजारासाठी गेला संपूर्ण आठवडा संकटाचा ठरला. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर वाढीचे संकेत मिळाल्याने बऱ्याच देशात मंदीची भीती निर्माण झाली विशेष करून अमेरिकन अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो पर्यायाने संपूर्ण जगातील फायन्यांशिअल मार्केट वर प्रभाव पडू शकतो या भीतीने गुंतवणूकदार धास्तावले.त्याचबरोबर चीनमध्ये कोविडची स्थिती बिघडल्याच्या बातम्या येऊ लागल्यानंतर तसेच इतर देशातही त्याची वाढ होत आहे असे निदर्शनात आल्यानंर बाजाराच्या भावनांना जोरदार धक्का बसला. भारतात देखील काही केसेस सापडल्यामुळे सरकारने सूचना वजा निर्देश जरी केल्याने गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली. तसेच रशियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर तेलाच्या किमतीही वाढल्या. यामुळे जगभरातील बाजार मोठ्या प्रमाणात कोसळले. गेल्या 7 दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 19 लाख कोटी रुपयांची मोठी घसरण झाली.

पुढील काही दिवस गुंतवणूकदारांसाठी जगभरातील घटनाक्रम महत्वाचे ठरतील व त्यानुसारच बाजाराची पुढील दिशा निश्चित होईल.
Technical view on nifty- मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीत घसरण होऊन निफ्टीने 18246-18137-18117-17969 हे स्तर गाठले. तांत्रिकदृष्ट्या निफ्टीत कमकुवतपणा जाणवत आहे.
निफ्टीने शुक्रवारी 17806 चा बंद दिला आहे. येत्या आठवड्यात जर हा स्तर तुटला.तर निफ्टी 17744-17692-17654-17637-17584 हे स्तर गाठेल
वर जाण्याकरिता निफ्टीला 17838-17910-17968-18044-18103 हे स्तर पार करणे अति आवश्यक राहील.
मार्केट ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहे. मार्केट बाउन्स बॅक होईल पण गुंतवणूकदारांनीं सावध पवित्र घेऊन क्वालिटी स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष भारताच्या नोव्हेंबर fiscal deficit च्या आकड्यांकडे राहील.

भारताची आर्थिक वाढ सध्या ‘अत्यंत गंभीर’ स्थितीत आहे .आणि त्याला आता पूर्ण समर्थनाची गरज आहे.असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीचे (एमपीसी) सदस्य जयंत आर वर्मा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.Indian economic growth ‘extremely fragile’, needs all support: RBI Monetary Policy Committee member Jayanth Varma

सेन्सेक्स ४६८अंकांनी वधारला. Sensex gains 468 points
जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर,आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजाराची सुरवात काहीशी सपाट झाली. परंतु दिवस जसजसा पुढे सरकत गेला तसतसा भारतीय बाजाराने मागील सत्रातील सर्व नुकसान भरून काढले व निफ्टीने पुन्हा एकदा निफ्टीने 18,400 चा स्तर गाठला. माहिती तंत्रज्ञान समभाग वगळता सर्व क्षेत्रांतील खरेदीमुळे (खास करून ऑटो आणि एफएमसीजी) सोमवारी बाजारात थोडी बहार आली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 468 अंकांनी वधारून 61,806 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 151 अंकांची वाढ होऊन निफ्टीने18,420 चा बंद दिला.
सेन्सेक्स खालच्या स्तरावरून ६०० अंकांनी सावरला
जागतिक बाजारातील कमकुवतपणा तसेच बँक ऑफ जपानने अनपेक्षितपणे 10 वर्षांच्या यील्डची अप्पर बँड लिमिट 50 bps पर्यंत वाढवून जागतिक बाजारपेठांना धक्का दिला त्यामुळे भारतीय बाजरात देखील घसरला. मागील सत्रात चांगली रिकव्हरी झालीअसून सुद्धा मंगळवारी बहुतांश क्षेत्रातील विक्रीमुळे बाजार पुन्हा दबावाखाली आला.सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला. गॅप-डाऊन स्टार्टनंतर, निफ्टीने इंट्राडे 18,202 ची नीचांकी पातळी गाठली. परंतु दुपारनंतर बाजारात चांगली रिकव्हरी झाली व निफ्टीने 18400 चा टप्पा गाठला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 103. अंकांनी घसरून 61,702 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 35अंकांची घट होऊन निफ्टीने18,385 चा बंद दिला.
कोविडच्या परत येण्याने बाजारात घबराट
सकारात्मक जागतिक संकेतांचा मागोवा घेऊन भारतीय बाजार उच्च पातळीवर उघडले परंतु चीनमध्ये कोविडची स्थिती बिघडल्याच्या बातम्या येऊ लागल्यानंतर बाजाराच्या भावनांना जोरदार धक्का बसला व बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला.बँक ऑफ जपानचा व्याजदर दीर्घ कालावधीसाठी वाढवण्याच्या निर्णयामुळे भारतीय बाजारातील अस्थिरतेत अजून भर पडली. तसेच सरकार आणि सरकारचा थिंक टँक नीती आयोग कोविडची वाढ आणि त्याच्या परिणामांबद्दल सावध झालाने , गुंतवणूकदारांचा मूड बिघडला.दिवसभरात सेन्सेक्स ७०० अंकांनी गडगडला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 635 अंकांनी घसरून 61,067 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 186 अंकांची घट होऊन निफ्टीने18,199 चा बंद दिला.
निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी घसरले. Indices end lower for the third day
आरबीआयच्या पुढील धोरण बैठकीत आणखी एक व्याजदर वाढीचे संकेत मिळाल्यानंतर विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारातील अस्थिरता प्रचंड वाढली. कोविडच्या प्रसाराबाबत वाढती चिंता आणि अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचना यामुळेही गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का बसला. जागतिक बाजारातील सकारात्मक भावना देशांतर्गत निर्देशांकांमध्ये आशावाद वाढविण्यात अयशस्वी ठरल्या. बँक, ऑटो, रियल्टी आणि मेटल निर्देशांकात मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 241अंकांनी घसरून 60,826 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 72 अंकांची घट होऊन निफ्टीने18,127 चा बंद दिला.
सेन्सेक्स, निफ्टी प्रत्येकी 1.5% घसरले.Sensex, Nifty fall 1.5% each
सलग चौथ्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाले.कमकुवत जागतिक संकेतांमुळे,बाजाराची सुरुवात नकारात्मक नोटवर झाली आणि दिवसभरात विक्री वाढतच गेली, बाजार सावरू शकला नाही. निफ्टी आणि सेन्सेक्सने अनुक्रमे 17,779.50 आणि 59,765.56 हा इंट्राडे नीचांक गाठला. चीन आणि जपानमधील कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ, यूएस अर्थव्यवस्थेशी संबंधित डेटा आणि जगातील इतर बाजारपेठेतील विक्री या मुळे बाजारावरील दबाव वाढला. बेअर्सनी दलाल स्ट्रीटवरील आपली पकड घट्ट केली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 980 अंकांनी घसरून 59,845 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 320 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,806 चा बंद दिला.
(लेखकशेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत ) jiteshsawant33@gmail.com)

ML/KA/PGB
24 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *