उद्या होणाऱ्या आयपीएल २०२३ च्या लिलावाबद्दल आपल्याला हे माहीत आहे का?

 उद्या होणाऱ्या आयपीएल २०२३ च्या लिलावाबद्दल आपल्याला हे माहीत आहे का?

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  क्रिकेट जगतातील लोकप्रिय सोहळा म्हणजे आयपीएल. 2023 मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठीच्या लिलावात 10 फ्रेंचायझी संघांच्या लिलावात एकूण 206.5 कोटी रुपये आहेत. या रकमेसह या संघांना एकूण 87 खेळाडूंची निवड करण्याचा पर्याय आहे. या 87 रिक्‍त स्‍लॉट्ससाठी 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी 405 खेळाडू निवडले गेले आहेत.Do you know about IPL 2023 auction tomorrow?

केरळमधील कोची शहरात आयपीएलचा लिलाव 23 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाईल. या लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर पाहता येईल.Do you know about IPL 2023 auction tomorrow?

लिलावासाठी निवडलेल्या 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आणि 132 विदेशी खेळाडू आहेत. यातील 119 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. उर्वरित 282 खेळाडू अनकॅप्ड आहेत. 19 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी आहे. या मध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. 11 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी आणि 20 खेळाडूंची मूळ किंमत एक कोटी आहे. लिलावात सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक पैसे (42.25 कोटी) आणि कोलकाता नाइट रायडर्सकडे सर्वात कमी पैसे (7.05 कोटी) आहेत.

ML/KA/PGB
22 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *