पालिका कामगारांना मुंबईत घरे द्या

 पालिका कामगारांना मुंबईत घरे द्या

मुंबई दि.21( एम एमसी न्यूज नेटवर्क): पालघर,वसई,विरार,कर्जत,कसारा,या भागातील मुंबई महानगर पालिकेचे सफाई कामगार सकाळी 6.30 वाजता कामावर हजर होऊ शकत नाही. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यात यावी,अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.Provide housing to municipal workers in Mumbai

म्युनिसिपल मजदूर संघ युनियनचे अध्यक्ष, रिपाई (आठवले) चे राष्ट्रिय अध्यक्ष व केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेली “म्युनिसिपल मजदूर संघ” ही युनियन गेली 25 वर्ष कामगार, कर्मचारी, अधिकारी अभियंते यांच्या न्याय- हक्कासाठी व त्यांच्या हितासाठी काम करीत आहे.
या संघटनेला 2022 मध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संघटनेचा ” रौप्य महोत्सव” ना .रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली व माजी राज्यमंत्री अविनाशजी महातेकर (राष्ट्रिय महासचिव रिपाई (आठवले), गैतमभाऊ सोनवणे, (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रिपाई आठवले),सिद्धार्थ कासारे (अध्यक्ष मुंबई प्रदेश रिपाई आठवले), बाळासाहेब गरूड (कार्याध्यक्ष मुंबई प्रदेश रिपाई आठवले), विवेक पवार (सरचिटणीस मुंबई प्रदेश रिपाई आठवले),सुनिल मोरे (कोषाध्यक्ष मुंबई प्रदेश रिपाई आठवले), सुनिल जांगळे, ( प्रमुख कामगार अधिकारी मुंबई महानगर पालिका) दिलिप थोरवडे (माजी उप प्रमुख अभियंता) आदि मान्यवरांच्या उपस्थितीत ” मंगळवार 3 जानेवारी 2023 रोजी सांय 4 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित करण्यात आला आहे. या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात स्मरणीका प्रकाशन, संघटनेच्या कार्यात मोलाचे कार्य केलेल्यांचा सत्कार, कोरोना योध्यांचा सत्कार, शाहीर अशोक कांबळे यांचा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती श्री.जाधव यांनी दिली.

ML/KA/PGB
21 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *