अंजुमन ए इस्लाम कॉलेजमध्ये खाद्ये महोत्सव उत्साहात साजरा
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डिसेंबर महिना सुरू झाला की सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विविध फेस्टिवलचे वेध लागतात. फेस्टिवलची पूर्वतयारी, पोस्टर्स, मिडीया पार्टनर, विविध सब इवेंट, यातून सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ पहायला मिळतं आहे. अशावेळी इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी यंदा वेगळी संकल्पना घेऊन मुंबई सीएसटी येथील अंजुमन ए इस्लाम कॉलेज मधील मग्न 2022 महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
20 आणि 21 डिसेंबरदरम्यान अंजुमन ए इस्लाम हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजातील मग्न 2022 सामाजिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवात कॉलेजातील विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबीरात मोठयाप्रमाणात सहभाग घेतला.या शिबीरात नायर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर तपासणी व मोफत मार्गदर्शन केल्याची माहिती डॉ.दिलीप जाधव यांनी दिली.
अंजुमन कॉलेजच्या मैदानात विद्यार्थ्यां आपल्या हाताने बनविलेले खाद्य्याचे विविध प्रकाराचे स्टॉल होते .स्टॉलवरील खाद्यपदार्थाचा अनेकांनी स्वाद घेतला.Anjuman-e-Islam College celebrates food festival with enthusiasm
यंदाचा मग्न 2022 महोत्सवाचे उदघाटन अॉपरेशन नॉर्थ इंडियाचे प्रमुख रोहित खोसला व प्रसिध्द सेफ शिप्रा खन्ना यांच्या हस्ते झाले . याप्रसंगी अंजुमन इस्लामचे अध्यक्ष डॉ.झहिर काझी,उपाध्यक्ष मुस्ताक अंतुले,हॉटेल मॅनेजमेन्टचे चेअरमन यास्मिन सैफुला,प्रार्चाय डॉ.रुकसाना बिलिमोरिया,प्राचार्या हरिश सुवर्णा आदि मान्यवर उपस्थित होते.
ML/KA/PGB
21 Dec .2022