लोकायुक्त नेमणूक आणि न्यायालयाचा निकाल हा योगायोग की …

 लोकायुक्त नेमणूक आणि न्यायालयाचा निकाल हा योगायोग की …

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  या १६ तारखेला न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या कृतीबद्दल निकाल देणे, त्याचवेळी लोकायुक्त नेमण्याची चर्चा होणे हा निव्वळ योगायोग आहे का की अन्य काही असा सवाल उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.The appointment of Lokayukta and the court verdict is a coincidence ?

नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याद्वारे मग बावनकुळेंची इच्छा पूर्ण होतेय का? की, चंद्रकांत पाटलांच्या मनावरचा दगड दूर करताहेत असेही प्रश्न त्यांनी विचारले. १७ तारखेच्या मोर्चात सीमाप्रश्न उपस्थित केला होता, मुख्यमंत्री म्हणाले आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या म्हणून आज गप्प बसावे असे नाही. पण आजही तिथे मराठी नागरिकांवर अत्याचार होताहेत त्याचे काय?

कोश्यारी अद्यापही पत्र लिहून विचारतात काय करु? त्यांनी स्वतः रामराम घेणे गरजेचे होते. कर्नाटक, गुजरात, तेलंगणा आमच्यावर हक्क सांगताहेत. नॅनो नाही तर फडणवीस साईज आमचा मोर्चा होता असे माझे उत्तर आहे. सावित्रीबाईंवर राज्यपाल बोलले तो नरॅटीव्ह आम्ही नाही सेट केला.

चंद्रकांत पाटील यांची क्लिप आलीय त्यात आई वडिलांना शिव्या दिल्या तर चालेल. हे प्रबोधनकारांनी ऐकून सणकन कानाखाली दिली असती. प्रबोधनकार वाचले ते चंद्रकांत पाटलांचे भाग्य.

नॅनो मोर्चा संबोधलेल्यांची बुध्दी नॅनो मोर्चानंतर आता बंदची सुरुवात झाली आहे. आमची लढाई ही त्यांच्या नरॅटीव्ह विरोधात. यांचा महाराष्ट्र द्वेष कमी होत नाहीए. आम्ही त्यांना ताळ्यावर आणू असे ठाकरे म्हणाले.

ML/KA/PGB
20 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *