पर्यावरणासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सुरू केला आहे अनोखा उपक्रम
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पर्यावरणासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सुरू केला आहे अनोखा उपक्रम. Mumbai Division of Central Railway has started a unique initiative for environment रेल्वे परिसर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉलधारकांना विभागीय व्यवस्थापक मुंबई यांनी प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ देण्याचे निर्देश दिले आहेत.
मध्य रेल्वेच्या स्टॉल्सवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सफाई योद्धाचा दर्जा
यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सर्व स्टॉल्सवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘सफाई योद्धा’चा दर्जा देण्यात आला असून त्यांना या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. यासोबतच आमच्या आदरणीय ग्राहकांनाही या मोहिमेत विविध माध्यमांतून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामुळे पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होईलच शिवाय पावसाळ्यात ड्रेनेज सिस्टीममध्ये आडकण्याने प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पाणी साचण्याची समस्याही दूर होईल, असं मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलेMumbai Division of Central Railway has started a unique initiative for environment
ML/KA/PGB
20 Dec .2022