‘वंदे मेट्रो’ हायड्रोजन पॉवरवर चालणारी पहिली स्वदेशी ट्रेन

 ‘वंदे मेट्रो’ हायड्रोजन पॉवरवर चालणारी पहिली स्वदेशी ट्रेन

नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर रेल्वे, मेट्रो आणि बुलेट ट्रेन चे जाळे विणण्यास प्रयत्नशील असलेल्या मोदी सरकार आता एक रेल्वे वाहतूक क्षेत्रात एक लक्षणीय कामगिरी करण्यास सज्ज झाले आहे. लवकरच भारतात हायड्रोजन पॉवरवर रेल्वे धावणार आहे. हायड्रोजनवर चालणारी ही वंदे मेट्रो ट्रेन पुढील वर्षात सुरु होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

ही ट्रेन देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन असणार आहे,  डिसेंबर २०२३ मध्ये ही ट्रेन प्रवाशांचा सेवेत दाखल होईल अशीही माहिती वैष्णव यांनी दिली.

वैष्णव म्हणाले, आम्ही वंदे मेट्रो ट्रेनचं डिझाईन तयार करत आहोत हे डिझाईन मे किंवा जूनपर्यंत तयार होईल. जागतीक स्तरावर आम्ही हे वंदे मेट्रोचं डिझाईन तयार करत आहोत जी मोठी झेप असेल. या वंदे मेट्रो ट्रेन्सची निर्मिती इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे की, देशभरात १९५० आणि १९६० च्या दशकात डिझाईन करण्यात आलेल्या सर्व ट्रेन्स बदलण्यात येतील.

SL/KA/SL
19 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *