राज्यातील कामगारांचा मुंबईत 21 डिसेंबरला महामोर्चा

 राज्यातील कामगारांचा मुंबईत 21 डिसेंबरला महामोर्चा

मुंबई दि.19( एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 21 डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

या मोर्चाला कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातून हजारो कामगार उपस्थित राहतील अशी माहिती भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष एडवोकेट अनिल ढुमणे, महामंत्री मोहन येणुरे, संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर, मुंबईचे अध्यक्ष बापू दडस. सचिव संदीप कदम, संघटक विद्यालय बडुलेकर आदी उपस्थित होते.

राज्यात कामगार कायद्यांची अंमलबजावणी ठप्प झालेली आहे. कंत्राटी कामगारांच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. महाराष्ट्रातील संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या अनेक समस्या आहेत. मात्र सरकार त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. याबाबत भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाने 6 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या काळात राज्यभर मजदूर चेतना यात्रेचे आयोजन केलेले होते.

या निमित्ताने राज्यभर सभा, मोर्चा, मिळावे घेण्यात आले. त्यात सरकारच्या कामगार विषयक धोरणाबद्दल कामगारांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली असून ती व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. कंत्राटी कामगार पद्धत बंद करा, हरियाणा व ओरिसा सरकार प्रमाणे कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत निर्णय घ्या, प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा रुग्णालय स्थापन करा. अंधेरी रुग्णालय त्वरित सुरू करा, चांगली सेवा द्या.

बांधकाम कामगार मंडळाचे लाभ पूर्ववत सुरु करा, नोंदणीतील अडथळे दूर करा , घरेलू कामगार कल्याण मंडळाचे २०१४ पासूनचे लाभ द्या आणि किमान वेतन लागू करा, अंगणवाडी सेविकांना किमान १५ हजार रुपये मानधन द्या. रिक्त जागा त्वरित भरा. 6. बिडी कामगारांना सरकारने जाहीर केलेल्या किमान वेतनाप्रमाणे वेतन द्या.आदी मागण्या साठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

SW/KA/SL

19 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *