जाणून घ्या एसटीची ‘ Smart Card’ सुविधा
मुंबई,दि. 18(एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवसेंदिवस अद्ययावत होणाऱ्या एसटी महामंडळाने सर्वसामान्यांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
महामंडळाने सामान्यांकरिता स्मार्ट कार्ड सेवा देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हे कार्ड घेणाऱ्यास प्रवासात दहा टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे प्रवासी आणि उत्पन्नही वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एसटीमधून दररोज ३२ ते ३३ लाख प्रवासी प्रवास करतात. १४ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. करोनापूर्वी काळात प्रवासी संख्या ६० लाखांहून अधिक आणि २१ ते २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र संप आणि करोनामुळे एसटीला मोठा फटका बसला असून प्रवासी संख्या कमी झाली आहे.
त्यामुळे प्रवाशांना स्मार्ट कार्ड द्वारा सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने विविध घटकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी, अंध व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, डायलिसिस रुग्ण यासह अन्य काही घटकांना स्मार्ट कार्ड देण्यात येते. वयवर्षा ६५ ते ७५ वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, तर विद्यार्थ्यांना ६६.६७ टक्के सवलत देण्यात येते. अन्य घटकांनाही सवलतीचा फायदा मिळतो.
त्यामुळे हा प्रवासी एसटीशी कायम जोडला गेला आहे. आतापर्यंत ३९ लाख ८४ हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झाली असून ३३ लाख ७४ हजार ५६२ कार्डचे वितरण झाले आहे.
SL/KA/SL
18 Dec.2022