अंध क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत सलग तिसऱ्यांदा विजयी
बंगळुरू,दि. 18(एमएमसी न्यूज नेटवर्क) :येथे झालेल्या अंध T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघाने बांग्लादेशचा पराभव करून सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. भारतीय फलंदाजांनी उभी केलेली 278 धावसंख्या गाठताना बांग्लादेश ची दमछाक झाली आणि भारताने तब्बल 120 धावांनी बांग्लादेशाला पराभूत केले.
कर्णधार अजय कुमार रेड्डी आणि फलंदाज सुनील रमेश यांच्या शतकी खेळीने भारताच्या विजयाला मोठा वाटा उचलला
SL/KA/SL
18 Dec.2022