महाविकास आघाडीचा निषेध महामोर्चा
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक Maharashtra Karnatak सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज
मुंबईत महाविकास आघाडीकडून भायखळा येथील रिचर्ड अँड क्रूडस कंपनी ते आझाद मैदान असा प्रचंड महामोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस,सीपीएमसह अनेक बडे नेत्यांसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी लाखोच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला गोलबोट लागू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी 11 वाजता भायखळा येथील रिचर्ड अँड क्रूडस कंपनी पासून सुरू झालेला हा मोर्चा जे. जे. मार्ग उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाइम्स ऑफ इंडिया मार्गी दुपारी आझाद मैदानात दाखल झाला. यावेळी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.मोर्चा त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे,छगन भुजबळ, जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड, खासदार संजय राऊत, युवा नेते आदित्य ठाकरे,सुभाष देसाई,सचिन अहिर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात, मुंबई अध्यक्ष भाई जगताप ,वंचित चे ऍड प्रकाश आंबेडकर, भाकप चे कॉ,. प्रकाश रेड्डी,माकपचे मिलींद रानडे इत्यादी नेते सहभागी झाले होते.यावेळी
“राज्यभरातून मोठ्या संख्येने दाखल झालेल्या कार्यकर्तेनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.कोशरी हटाव महाराष्ट्र बचाव व फुले -शाहू -आंबेडकरांचा विजय असो,अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस,सीपीएमसह अनेक बड्या नेत्यांची भाषणे झाली.
ML/KA/PGB
17 Dec 2022