सोन्याच्या दरात काहीशी घसरण

 सोन्याच्या दरात काहीशी घसरण

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजीत असलेल्या सोन्याच्या दरात आज काहीशी घसरण झाल्याने लग्नघरांना दिलासा मिळाला. जवळपास 55 हजार रुपयांपर्यंत पोहोचलेल्या सोन्याच्या किमतीत काल 800 रुपयांनी घट झाली.

 १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४९९९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५०,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७०,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,१०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार

  • मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४९,९९० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,२०० प्रति १० ग्रॅम आहे.
  • पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४९,९९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,५३० रुपये असेल.
  • नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४९,९९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,५३० रुपये इतका असेल.
  • नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,०२० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,५६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७०५ रुपये आहे.
 गेल्या काही वर्षांपासून महागाई मोजण्यासाठी सोन्याच्या किंमती हे एक मानक आहे असं आपण म्हणू शकतो. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक मानत आहेत. कारण त्यातून चांगला परतावा मिळतो.

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

SL/KA/SL

16 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *