सुपरमॅनच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी
दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डीसी स्टुडिओजचे को-हेड जेम्स गन यांनी नुकतेच जाहीर केले की ते सुपरमॅनवर आधारित एक चित्रपट लिहीत आहेत. परंतु हे सांगताना सुपरमॅन म्हणून डिसी फॅनच्या मनात खास जागा असणाऱ्या हेन्री कॅव्हिल यात सुपरमॅनच्या भूमिकेत दिसणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.
या चित्रपटात सुपरमॅनच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कथानक असल्याने ही भूमिका हेन्री कॅव्हिल करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बराच काळ गन हा सुपरमॅनच्या या कथानकावर काम करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
सुपरमॅनचे पात्र आत्तापर्यंत अनेक अभिनेत्यांनी साकारले आहे, परंतु पडद्यावर हेन्री कॅव्हिलने जी जादू केली ती इतर कोणीही करू शकले नाही. जस्टीस लीगनंतर सर्वांचा लाडका हेन्री कॅव्हिल सुपरमॅनच्या व्यक्तिरेखेमध्ये ब्लॅक ॲडममध्ये दिसला होता.
सुपरमॅनच्या चाहत्यांसाठी ही एक वाईट बातमी समोर आली आहे. हेन्री कॅव्हिल सुपरमॅनच्या भूमिकेत दिसणार नाही याने नक्कीच सुपरमॅनचे चाहते दुःखी होतील. हेन्री कॅव्हिलने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
TM/KA/SL