या ग्रामपंचायतीचा पूर्ण कारभार महिलांच्या हाती

 या ग्रामपंचायतीचा पूर्ण कारभार महिलांच्या हाती

बुलढाणा, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्रामप्रशासनामध्ये स्त्रियांचा सहभाग ही गावाच्या संपूर्ण विकासाची हमी मानली जाते. कारण कुटुंबाप्रमाणेच गावाच्या विकासाच्या मूलभूत बाबींवर महिला अधिक डोळसपणे पाहू शकतात. आरक्षणाच्या माध्यमातून ग्रामप्रशासनात स्त्रियांचा सहभाग वाढला असला तरीही संपूर्ण कारभार महिला चालवत आहेत, असे दृष्य मात्र अद्याप दुर्मिळ होते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील माडखेड गावाने  ग्रामपंचायतीत संपूर्ण महिला राज प्रत्यक्षात आणले आहे.

entire administration of village panchayat is in the hands of women Buldhana District- Madkhed Grampanchayat

बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोदच्या मडाखेड गावात महिलाराज असणार आहे कारण तिथल्या ९ महिला सदस्या आता गावचा कारभार चालवणार आहेत. इथल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना संधी देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. निवडणूक न घेता बिनविरोध पद्धतीने ९ महिलांना सदस्यपदी नेमून गावकऱ्यांनी महिलांच्या हाती ग्रामपंचायतीच्या चाव्या सुपूर्द केल्या.

SL/KA/SL

15 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *