सीमावाद प्रकरणी जैसे थे स्थिती कायम ठेवा
दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणी न्यायालयाचा निर्णय येत नाही तोवर कोणीही एकमेकांच्या भागावर दावा करायचा नाही असा निर्णय आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
दोन्ही बाजूने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहावे , दोन्ही बाजूने कोणतेही अवास्तव दावे करू नये, दोन्ही बाजूने प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती सीमा भागातील प्रश्नांवर चर्चा करतील असे नक्की करण्यात आल्याचे अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे, जत तालुक्यातील काही गावे आम्हाला हवी असल्याचे बोंमई यांनी सांगितले, त्याला त्या गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला , आम्हाला सुविधा मिळत नाही त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जायचं आहे असे गावकरी म्हणतात .
दोन्ही बाजूने याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, त्याला हिंसक वळण ही लागले , दोन्ही बाजूने राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले , या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली होती.
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले होते. त्यांच्यासोबत दोन्ही बाजूच्या गृहमंत्र्यांनीही या बैठकीत भाग घेतला.
ML/KA/SL
14 Dec. 2022