पुरस्कार रद्द , राजीनामे सुरू

 पुरस्कार रद्द , राजीनामे सुरू

मुंबई,दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी पॉलिट ब्युरो सदस्य कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम‘ या  पुस्तकाच्या अनघा लेले यांनी केलेल्या  अनुवादीत पुस्तकाला  जाहीर झालेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ शासनाने काल रद्द केला आहे. यावरुन साहित्यिक वर्तुळाच पडसाद उमटलेले दिसून येत आहे. पुरस्कार रद्द केल्याच्या निषेधार्थ राज्यातील काही साहित्यिकांना पुरस्कार वापसीचा मार्ग अवलंबला आहे, तर काहींनी शासनाच्या भाषाविषक महत्त्वाच्या पदांवरून राजीनामा देण्याचे सुरू केले आहे.

आज माजी प्रशासकीय अधिकारी आणि मराठी साहित्य संमलनाचे अध्यक्षपद भूषवलेले साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिला आहे.

तर काल सरकारच्या निर्णयाचा निषेध करत लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान सचिवांना त्यांनी पत्र लिहून राजीनामा पाठवला आहे. ते पत्र त्यांनी फेसबुकवर शेअर केलं आहे.
त्याच बरोबर  राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्य पदी असलेल्या कवयित्री नीरजा आणि हेरंब कुलकर्णी यांनी देखील राजीनामा दिला आहे.
त्याच बरोबर सरकारचा निषेध करत ‘भुरा’चे लेखक शरद बाविस्कर यांनी ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ नाकारला आहे. प्रौढ वाङ्मय- आत्मचरित्र प्रकारासाठी बाविस्कारांना पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार बाविस्करांनी नाकारला आहे.

पुरस्कार वापसीनंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी आपली भूमिका मांडत पुरस्काराची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक झाली असून या पुस्तकाची निवड गणेश विसपुते यांनी केली होती असे सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वपदाचा ज्यांनी ज्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याशी बोलण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

या पुरस्कारामुळे निर्माण झालेल्या वादंगाबाबत भाष्य करणारा एमएमसी न्यून नेटवर्कचा हा व्हिडीओ अवश्य पहा. https://youtu.be/19GfPjlcWC4

SL/KA/SL

14 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *