रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरचे शतक

 रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरचे शतक

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने आज रणजी पदार्पणातच शतकी खेळी करून वडीलांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. सचिनने 1988 मध्ये रणजी पदार्पणात शतक झळकावले होते. 34 वर्षांनंतर त्यांचा मुलगा अर्जुनने 23 वर्षे वयात असाच पराक्रम केला आहे.

अर्जुनने गोव्याकडून खेळताना राजस्थानविरुद्ध ही कामगिरी केली आहे. शतक झळकावल्यानंतर अर्जुन नाबाद आहे. त्याचबरोबर गोवा संघ पहिल्या डावात 400 धावांच्या जवळ पोहोचला आहे.

सचिनने मुंबईसाठी 11 डिसेंबर 1988 रोजी गुजरातविरुद्ध पहिला रणजी सामना खेळला होता. त्यावेळी तो फक्त 15 वर्षांचा होता. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार मारले. सचिनने 100 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारताकडून शतक झळकावणारा सचिन हा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला. सचिनने नंतर दुलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले.

अशाच प्रकारे अर्जुनला ही आता रणजीच्या मैदानावर सुर गवसला आहे.

SL/KA/SL

14 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *