या जिल्ह्यात वर्षभरात 138 शेतकरी आत्महत्या

 या जिल्ह्यात वर्षभरात 138 शेतकरी आत्महत्या

मुंबई,दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कापूस, कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनात विदर्भातील एक प्रमुख जिल्हा असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात शेतकरी आत्महत्यांचे सावट गडद होताना दिसत आहे. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, हमीभावाने शेतमाल खरेदी वेळेवर न होणे, शेतीपंपांची वीज कापणी अशा अनेक कारणांनी त्रस्त असलेल्या या जिल्ह्यात यार्षी  जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत  तब्बल १३८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे

यात ४३ प्रकरणे पात्र ठरली. तर ४३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. तसेच ५२ प्रकरणं चौकशीत प्रलंबित ठेवण्यात आलेली आहे. शेतकरी आत्महत्यांचा आकडा १३८ झाला असला तरी मदत केवळ ४० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांनाच ४१ लाख रुपयांची शासनाकडून मदत मिळाली आहे.

त्यामुळे मदतीचे नेमके निकष काय, आणि मदत कशी दिली जाते, याचा देखील गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, अशी मागणी कृषी अर्थतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. सत्ता संघर्षामध्ये रमलेल्या महाराष्ट्रात बळीराजाचे अजून किती बळी जाणार असा संतप्त सवाल जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

SL/KA/SL

13 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *