अनिल देशमुखांना जामीन मात्र लगेच सुटका नाही

 अनिल देशमुखांना जामीन मात्र लगेच सुटका नाही

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाला आहे मात्र आणखी किमान दहा दिवस त्यांची सुटका होणार नाही.

विशेष सीबीआय कोर्टाकडून अनिल देशमुख यांना आज जामीन मंजूर झाला , 1 लाखांच्या जातमूचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला . आठवड्यातून दोन दिवस ईडी कार्यालयात हजेरी लावणं बंधनकारक असणार आहे.

मात्र आपल्या या आदेशाला कोर्टाने दहा दिवसांची स्थगिती दिली असून सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यासाठी ही वेळ सीबीआय ला देण्यात आली आहे त्यामुळे देशमुख यांची लगेच सुटका होणार नाही.

ML/KA/PGB
12 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *