तृतीयपंथियांना पोलिस भरतीचा मार्ग मोकळा
मुंबई,दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तृतियपंथिय व्यक्तींना सामान्य नागरिकांप्रमाणे कायदेशीर हक्क मिळावे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घ्यावे यासाठी राज्यभरातील सामाजिक संघटना सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना काही अंशी का होईना आशादायक चित्र दिसू लागले आहे. महाराष्ट्रात आता तृतीयपंथीयांना देखील पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे.
तृतीयपंथीयांच्या शाररिक चाचणीसाठी नियमावली बनवा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिल्यानंतर याबाबत राज्य शासनानं मुंबई हायकोर्टात भूमिका मांडली. त्यानुसार १३ डिसेंबरपासून तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यानंतर त्यांची शाररीक चाचणी देखील पार पडणार आहे.
परंतु सध्या हा निर्णय सध्या केवळ राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीसाठीच लागू असणार आहे. Opportunity to transgenders in police recruitment through MPSC Exam
MPSC च्या वेबसाईटवरील फॉर्ममध्ये याआधी फक्त लिंगासाठी स्त्री आणि पुरुष हे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे तृतीयपंथिय व्यक्ती अर्ज दाखल करू शकत नव्हत्या. केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाचे तृतीयपंथीयांना देखील सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिलेले असतानाही राज्याने याबाबत अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देऊन तृतीयपंथियांना पोलिस भरतीमध्ये संधी देण्याचा मार्ग खुला केला आहे.
SL/KA/SL
12 Dec. 2022