सीमा प्रश्न आंदोलन पार्श्वभूमीवर आजपासून बंदी आदेश
कोल्हापूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाविकास आघाडीनं दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक दिली आहे त्यामुळे इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या आंदोलनात सीमा भागातील मराठी भाषिक देखील सहभागी होण्याची शक्यता असल्यानं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून बंदी आदेश लागू केला आहे.
9 ते 23 डिसेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात राहणार बंदी आदेश लागू राहणार आहे. याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
ML/KA/SL
9 Dec. 2022