गुजरातमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय
अहमदाबाद, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण देशाचा लक्ष लागून राहिलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणूकीत आज सत्ताधारी भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 182 जागांपैकी 156 जागा जिंकून भाजपाने हे यश मिळवले आहे.
कॉंग्रेस पक्षाला केवळ 17 जागा जिंकता आल्या आहेत. तर आम आदमी पक्षाने गुजरातमधील प्रथम पदार्पणातच खाते उघडून 5 जागांवर विजय मिळवला असून 4 जागी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. या घवघवीत यशामुळे आता गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे.
पूल दुर्घटनेमुळे चर्चेत आलेल्या मोरबीमध्ये देखील भाजपचे उमेदवार जिंकून आले आहेत. मोरबीमध्ये भाजपचे कांती अमृतिया यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 62 हजार मतांनी पराभव केला.
या ऐतिहासिक विजयानंतर 12 डिसेंबर रोजी गांधीनगर येथील विधानसभेच्या मागे असलेल्या हेलिपॅड मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
SL/KA/SL
8 Dec. 2022