रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात वाढ, गृह कर्जासह सर्व कर्ज महागणार
नवी दिल्ली,दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षभरात सलग पाचव्यांदा रेपो दरामध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 पॉइंटची वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे एकूण रेपो रेट 5.9 टक्क्यांवरून थेट 6.25 टक्क्यांवर गेला आहे.
2 डिसेंबर रोजी परकीय चलन साठा $561.2 अब्ज इतका आहे. आपल्या परकीय चलन साठ्याचा आकार दिलासादायक आहे आणि त्यात वा वाढही होत आहे, अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली.
या वर्षात याआधी आरबीआयने व्याजदरात चार वेळा वाढ केली आहे. या वर्षी मध्यवर्ती बँकेने रेपो दरात मेमध्ये ०.४० टक्के, जून आणि ऑगस्टमध्ये ०.५० टक्के आणि सप्टेंबर महिन्यात पुन्हा ०.५० टक्के वाढ केली होती. या निर्णयामुळे आता गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत.
वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात 0.35% वाढ केल्यामुळे आता होम लोनपासून ते ऑटो आणि पर्सनल लोनपर्यंत सर्व काही महाग होईल आणि म्हणजेच तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल.
विविध प्रकारच्या कर्जांवरील व्याज दरात किती वाढ करायची याबाबतचा निर्णय प्रत्येक बॅंक आपापल्या आर्थिक स्थितीनुसार आणि आर्थिक धोरणांनुसार घेते.
रेपो दराचा आपल्याशी थेट संबंध काय?
रेपो रेट म्हणजे आरबीआय अन्य बॅंकांना ज्या दराने कर्ज देते तो दर. तर रिव्हर्स रेपो दर हा दर आहे ज्यावर आरबीआय पैसे ठेवण्यासाठी बँकांना व्याज देते. आरबी आयच्या रेपो रेटमधील चढ-उतारानुसार बॅंका त्यांच्या ग्राहकांना द्यायच्या विविध प्रकारच्या कर्जाचे दर निश्चित करतात. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होतात आणि या क्रमाने ईएमआयमध्येही वाढ होते.
SL/KA/SL
7 Dec. 2022