महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगाव मध्ये अटक

 महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगाव मध्ये अटक

बेळगाव, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातीलनेत्यांना सीमाभागात येण्यापासून रोखून घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah यांना पत्र देण्यासाठी गेलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आणि सुमारे तीन तासांनी त्यांची सुटकाही केली.

या विरोधात सीमाभागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सरकारनं नियुक्त केलेले सीमा समन्वय  मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि
उच्चाधिकार समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांचा आज बेळगाव दौरा होता. पण, त्यांनी हा दौरा लांबणीवर टाकला.

महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये, यासाठी कन्नड संघटनांनी आंदोलन केलं होत़. सरकारनेही तसे पत्र महाराष्ट्राला पाठवलं होतं. अखेर बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना जिल्हा बंदी केल्याचा आदेश बजावला होता.

या बंदीमुळे महाराष्ट्रातील नेत्यांच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी याची दखल घेऊन सीमावाद तत्काळ सोडवावा, अशी मागणी करणारं पत्र जिल्हाधिकारी पाटील यांच्याकरवी पाठवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती नेते आज दुपारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमले होते. पण, या नेत्यांना पोलिसांनी अटक केली ,त्यांच्याकडून निवेदन न स्वीकारता त्यांना तीन तासांनी परत पाठविण्यात आले. Leaders of Maharashtra Integration Committee arrested in Belgaum

ML/KA/PGB
6 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *