या राज्यात सुरू झाले देशातील पहिले Gold ATM

 या राज्यात सुरू झाले देशातील पहिले Gold ATM

मुंबई,दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांचे सोने प्रेम सर्व जगात प्रसिद्ध आहे. महागाई कितीही वाढली तरी लग्नसराई आणि महत्त्वाच्या शुभ दिवशी सोने आवर्जुन खरेदी केले जाते. गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही बरेच जण सोने खरेदी करतात. विशेष बाब म्हणजे आता Gold ATM द्वारे अगदी सोप्या पद्धतीने सोने  खरेदी करता येणार आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये देशातील पहिले रिअल टाइम सोन्याचे एटीएम बसवण्यात आले आहे.

या एटीएमद्वारे लोक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून सोने खरेदी करू शकतात. या एटीएममधून 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंतची सोन्याची नाणी खरेदी करता येतील. ओपनक्यूब टेक्नॉलॉजीजच्या मदतीने हैदराबादस्थित कंपनी गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेडने देशातील पहिले सोन्याचे एटीएम स्थापित केले आहे. 

कंपनीचे सीईओ सी. तरुज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एटीएममधून लोक 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंतची सोन्याची नाणी काढू किंवा खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर या एटीएमवरील सोन्याची किंमत थेट अपडेट केली जाईल, जेणेकरून फसवणूक होणार नाही. या गोल्ड एटीएमची सेवा 24 तास उपलब्ध असेल.

गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड  कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आणखी काही एटीएम उघडणार आहे. कंपनी पेड्डापल्ली, वारंगल आणि करीमनगर येथेही गोल्ड एटीएम उघडण्याचा विचारात आहे. याशिवाय, पुढील 2 वर्षांत भारतभर सुमारे 3,000 गोल्ड एटीएम उघडण्याची कंपनीची योजना आहे.

SL/KA/SL

6 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *