तिहार जेलमध्ये क्रुरकर्मा आफताबला मिळतात या सुविधा

 तिहार जेलमध्ये क्रुरकर्मा आफताबला मिळतात या सुविधा

नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसई येथील तरुणी श्रद्धा वालकर हिचा अत्यंत निर्घुण खून करणारा आफताब सध्या तिहार जेल मध्ये आहे. त्याला बॅरेक क्रमांक-४ मध्ये ठेवण्यात आले आहे. तो या जेलमध्ये तासंतास बुद्धिबळ खेळतो.

त्याने केलेल्या विनंतीनंतर जेलमध्ये त्याला पॉल थेरॉक्सचे ‘द ग्रेट रेल्वे बाजार’ हे पुस्तक उपलब्ध करून दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

तिहार जेलमध्ये प्रत्येक कैद्याच नाव, गुन्हा, त्याचे वय, लिंग अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन त्याचा बॅरक क्रमांक निश्चित केला जातो. बॅरक क्रमांक – १ मध्ये Sआणि Y या अक्षराने ज्यांचे नाव सुरु होते ते कैदी असतात. ४ मध्ये ज्यांचे नाव Aआणि R या अक्षरांनी सुरु होते ते कैदी असाता. अफताबला याच बॅरकमध्ये ठेवण्यात आले आहे.

Aftab gets these facilities in Tihar Jail

SL/KA/SL

4 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *