या राज्यात मंदीरात मोबाईल वापरास न्यायालयाकडून बंदी

 या राज्यात मंदीरात मोबाईल वापरास न्यायालयाकडून बंदी

चेन्नई,दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दाक्षिणात्य राज्ये तेथील मंदीरांमधील स्वच्छता आणि पावित्र्य जपण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. मंदीरात प्रवेश करताना घालायची वस्त्रे आणि अन्य उपचारांबाबतही कसोशीने काळजी घेतली जाते. मंदिरात फोनमुळे मन एकाग्र होत नाही. मूर्तींचे फोटो काढले जातात, तसेच महिलांचेही त्यांच्या अपरोक्ष फोटो घेतले जातात, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच मंदीराचे पावित्र्यही धोक्यात येते, अशी याचिका एका व्यक्तीने दाखल केली होती. याची दखल घेत मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील मंदिरांमध्ये मोबाइल फोनवर बंदी घातली आहे.

मंदिरांचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. त्याचबरोबर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिरांच्या बाहेर लॉकर्सची व्यवस्था असावी. आदेशाचे पालन करण्यासाठी मंदिरांत सुरक्षा रक्षक तैनात केले जावेत. असेही कोर्टाने म्हटले आहे.

Madras High Court Bans Mobile Phones In Temples Across Tamil Nadu

SL/KA/SL

4 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *