आठवड्यातील हे 5 दिवस राष्ट्रपतीभवन सर्वसामान्यांसाठी खुले
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींचे शासकीय निवासस्थान असलेले राष्ट्रपतीभवन 1 डिसेंबरपासून आठवड्यातून 5 दिवस सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हे आठवड्यातील 5 दिवस राष्ट्रपती भवनाला भेट देता येणार आहे. राजपत्रित सुट्टीच्या दिवशी इमारत बंद राहणार आहे. या दरम्यान दिवसभरात येणा-या सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच स्लॉट (Five slots for citizens)निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी (Rashtrapati Bhavan Booking) तुम्हाला आधीच नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी या संकेतस्थळावर rb.nic.in/rbvisit/visit_plan.aspx ला भेट द्या.
राष्ट्रपती भवन ही अपवादात्मक कल्पनाशक्ती आणि कुशलतेचे शिल्पकार सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांची निर्मिती होती. सर लुटियन्स यांनीच 330 एकर वर वसलेल्या या H आकाराच्या देखण्या ब्रिटीशकालिन इमारतीत एकूण 340 खोल्या आहेत ज्यामध्ये चार मजले, 2.5 किलोमीटर कॉरिडॉर आणि 190 एकर बागेचा परिसर आहे.
Rashtrapati Bhavan is open to general public 5 days a week