या दिवशी होणार IPL 2023 साठी मिनी लिलाव
मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात उतरलेल्या 991 पैकी 87 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. मिनी लिलाव प्रक्रिया कोची येथे 23 डिसेंबरला पार पडणार आहे. एकूण 991 खेळाडूंपैकी 714 खेळाडू भारतीय आहेत.
या मिनी लिलावात २७७ परदेशी खेळाडू सहभागी होणार आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ५७ खेळाडू आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील ५२ खेळाडूंनी आपली नावे दिली आहेत.
तर वेस्ट इंडिजचे ३३, इंग्लंडचे ३१, न्यूझीलंडचे २७, श्रीलंकेचे २३, अफगाणिस्तानचे १४, आयर्लंडचे ८, नेदरलँडचे ७, बांगलादेशचे ६, यूएईचे ६, झिम्बाब्वेचे ६, नामिबियाचे ५ आणि स्कॉटलंडचे २ खेळाडू आहेत.
2 Dec. 2022