१३ वर्षांच्या मुलीसोबत शाळेतच सामूहिक अत्याचार
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच शाळेतील मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे.या घटनेनं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.Gang rape with 13-year-old girl at school
मुंबईच्या माटुंगा येथील महापालिकेच्या शाळेत वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळं सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या हॉलमध्ये येण्यास सांगितले होते. त्याच दरम्यान इयत्ता आठवीच्या एका 13 वर्षीय मुलीला वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी अडवलं आणि तिच्यावर बलात्कार केला.यावेळी त्यांचे 2 साथीदार वर्गाबाहेर पहारा देत होते.दरम्यान पीडित मुलीने पोटदुखीची तक्रार केल्यानंतर तिच्या आईला याबाबत माहिती मिळाली. यानंतर पीडित मुलीच्या आईनं पोलिसांत तक्रार दाखल केली. After this, the victim girl’s mother lodged a complaint with the police.
सोमवारी ज्या वेळेस ही घटना घडली. त्याचवेळी सर्व विद्यार्थी व शिक्षण शाळेतील वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमात होते. त्याचवेळी आरोपींनी हा घुनास्पद प्रकार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल केला असून दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याकारण्याने त्यांना डोंगरीतील बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे.Gang rape with 13-year-old girl at school
SW/KA/PGB
2 Dec .2022