रजनी शिर्के यांना कशिदाकारीचा राष्ट्रीय पुरस्कार!
यवतमाळ, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एका रंगीत कापडावर सुई आणि धाग्याच्या माध्यमातून चित्र काढणे किंवा नक्षी काढणे याला भरतकाम, एम्ब्रोईडरी किंवा कशीदाकारी म्हटले जाते. कशीदाकारी ही एक प्राचीन हस्तकला आहे .National award for embroidery to Rajni Shirke!
परंतु काळाच्या ओघात ही कला लोप पावती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .मात्र अशावेळी यवतमाळच्या रजनी शिर्के यांनी या कलेला एक नव संजीवनी दिली आहे.रजनी शिर्के यांनी ही कला इतक्या चांगल्या प्रकारे अवगत केली आहे की त्यांनी कशीदाकारी केलेल प्रत्येक चित्र जणू जिवंतच वाटत.
त्यांनी आतापर्यंत निसर्ग चित्र, पक्षी चित्र आणि असंख्य व्यक्तीचित्रही कशीदाकारी या माध्यमा मधून काढली आहेत .
एखाद्या चित्रकाराने अप्रतिम रंगसंगती वापरून चित्र काढावं त्याप्रमाणे रजनी शिर्के धाग्यांची रंगसंगती वापरून कशीदाकारी करीत असतात. साहजिकच त्याला जिवंतपणा येतो.
रजनी शिर्के या इथेच थांबल्या असेही नाही तर त्यांनी जिल्ह्यातील, विदर्भातील किंबहुना महाराष्ट्रातील असंख्य महिलांना आजवर कशीदाकारीचे प्रशिक्षण दिलेआहे ,आजही देत आहेत.
त्यांच्या या कलेची , कार्याची दखल भारत सरकारने घेतली असून त्यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे .केंद्रीय वस्त्र मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नुकताच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रजनी शिर्के यांनी ही कला जिवंत राहण्यासाठी आपण सतत प्रयत्न करू असे यावेळी सांगितले.
ML/KA/PGB
2 Dec .2022