प्रतिक्षा संपली, या दिवशी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, पंतप्रधानांच्या हस्ते

 प्रतिक्षा संपली, या दिवशी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, पंतप्रधानांच्या हस्ते

मुंबई,दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  मुंबई-नागपूर रस्ते प्रवासाचे अंतर लक्षणियरित्या कमी करणाऱ्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणास अखेर मुहूर्त सापडला आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी होणार आहे.

 एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार ही माहिती दिली आहे.महामार्गावरील वायफड नाक्याजवळ लोकार्पण सोहळ्यासाठीचं सभास्थळ उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

या पहिल्या टप्प्यातील द्रुतगती महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी अंतर आता १0 तासांऐवजी फक्त ५ तासांत पार करता येणार आहे.

समृद्धी महामार्गाबाबत

  • यामुळे मुंबई ते नागपूर ८ तासांत अंतर पार करता येईल.
  • या दृतगती महामार्गाची एकूण लांबी ७०१ किमी आहे.
  • महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्चाचे नियोजन आहे.
  • हा महामार्ग १० जिल्ह्यांमधील ३९० गावांना जोडणार आहे.

ML/KA/SL

1 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *