शेतकऱ्यांचा कल वाढला ड्रोन फवारणी कडे ….
औरंगाबाद, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): औरंगाबाद तालुक्यात येत असलेल्या वळदगांव, पंढरपूर,तिसगाव, पाटोदा, येथील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापराकडे अधिक आकर्षित होत असून कमी वेळात शेतातील अधिक कामं कशी शुलभ करता येतील याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरित आहेत .Farmers’ tendency towards drone spraying has increased.
परिसरात ऊस,कापूस, तूर आदी पिके शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात पेरलेली असून पिकावर पडलेली अळी तसेच ऊस पिकावर पडलेल्या पांढरा मावा आदी रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी चक्क येथील शेतकरी बांधव पाठीवरच्या फवारणीला फाटा देत चक्क ड्रोन द्वारे फवारणी करुन घेत आहेत.
कमी खर्चात आणि कमी वेळात सुलभ फवारणी होत असल्याने शेतकऱ्यांचा अधिकचा खर्च वाचत आहे.
ML/KA/PGB
30 Nov .2022