हस्तशिल्प राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभय पंडित

 हस्तशिल्प राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभय पंडित

ठाणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रीय स्तरावरील हस्तशिल्प पुरस्कार प्राप्त कलाकारांमध्ये महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश असून ठाणे जिल्ह्यातील भाईंदरचे रहिवासी अभय पंडित यातील एक मानकरी आहेत. दिल्लीत नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. Handicraft National Awardee Abhay Pandit from Bhayander

कुंभार कामातून नक्षीदार माती शिल्प बनविणाऱ्या अभय पंडित यांना आपल्या माता पित्याकडून कुंभारकलेचा वारसा लाभला आहे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त ब्रह्मदेव राम पंडित यांनी बिहार मधून येऊन आपली कुंभारकला भाईंदर मध्ये विकसित केली, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
हाच वारसा घेऊन अभय यांनी आधी मुंबईच्या जे जे मधून पदवी प्राप्त केली आणि मग पाँडिचेरी तसेच इंग्लंड मध्ये जाऊन या कलेचे आधिकचे शिक्षण घेतलं.

माती शिल्पात नक्षिकारी हे त्यांचं वैशिष्ट्य असून त्यासाठीच त्यांना २०१८ सालचा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

अभय यांची आई आणि पत्नी असे संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात असून त्या दोघींनाही राज्य स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या या कलेचा वारसा इतरांनाही द्यावा यासाठी मुंबईत एखादे दालन सुरू करण्याचा इरादा अभय पंडित यांचा आहे.

ML/KA/SL

30 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *