काश्मीर टूरसाठी IRCTC चे स्वस्तात मस्त पॅकेज

 काश्मीर टूरसाठी IRCTC चे स्वस्तात मस्त पॅकेज

मुंबई,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरच्या पर्यटनाचा आनंद लुटावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते पण प्रश्न सतावतो तो बजेटचा. पण आता त्याची चिंता करण्याच कारण नाही कारण IRCTC  ने या हिवाळ्यात काश्मीर सफरीचा आनंद लुटण्यासाठी स्वस्तात मस्त असे पॅकेज देऊ केले आहे.

IRCTC  काश्मीर पॅकेजचे काही तपशील

IRCTCच्या या टूर पॅकेजमध्ये फ्लाइट, हॉटेल, लोकल ट्रान्सपोर्ट, जेवण तसेच नाश्ता यांचा समावेश आहे. या टूर पॅकेजची सुरुवात 25, 170 रुपयांपासून होते. जर फक्त एक व्यक्ती प्रवास करणार असेल, तर 37,410 रुपये द्यावे लागतील. जर दोन व्यक्ती प्रवास करणार असतील तर 30055 रुपये द्यावे लागतील आणि तीन लोक प्रवास करणार असतील तर 29, 250 द्यावे लागतील. जर तुम्ही मुलांसमवेत प्रवास करणार असाल परंतु एक्स्ट्रा बेड घेणार नसाल तर 25, 110 रुपये द्यावे लागतील. सरकारी कर्मचारी यावर LTC चा फायदा घेऊ शकतात. IRCTCच्या ऑफिशियल वेबसाईटवर या टूर पॅकेजची तमाम माहिती तुम्हाला मिळेल. अधिक माहितीसाठी https://www.irctctourism.com/   वेबसाईटला अवश्य भेट द्या.

IRCTC offering affordable Kashmir Tour Package.

SL/KA/SL

29 Nov. 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *