अमेरिकन महिलेसमोर टॅक्सीचालकाचे अश्लील चाळे

 अमेरिकन महिलेसमोर टॅक्सीचालकाचे अश्लील चाळे

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कामानिमित्त भारतात आलेल्या अमेरिकन महिलेसमोर टॅक्सीत अश्लील चाळे करणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली.योगेंद्र उपाध्याय असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. A taxi driver sexually assaulted an American woman शनिवारी दुपारच्या वेळी तक्रारदार महिला आपले काम आटपून घरी जात होती .

यावेळी तिने खासगी इनोव्हा कार बुक केली होती आणि या कारमध्ये तिचे सहकारीही होते. अंधेरी येण्यापूर्वीच तिच्यासोबत असलेले सहकारी इनोव्हा कार मधून उतरले. दरम्यान अमेरिकन महिला चालकाच्या बाजूच्या सीटवर बसली होती आणि तिच्यासमोरच चालकाने महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न अशा प्रकारचे कृत्य केल्याने ती घाबरली. तिने चालकास कार जे. पी. रोडवर थांबवण्यास सांगितले. ही बाब रस्त्यावरील लोकांना कळताच त्यांनी चालकाला पकडून डी.एन. नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून चालक योगेंद्र उपाध्याय याला पोलिसांनी अटक केली

ML/KA/PGB
29 Nov .2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *