आरे मेट्रो कार शेडचे काम सुरूच राहील
दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई मेट्रो तीन साठी अत्यावश्यक असणाऱ्या आरे कार शेडच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्याने हे काम सुरूच राहणार आहे.Aarey Metro Car Shed will continue to operate
आरे मेट्रो कार शेडचे काम महा विकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंद केले होते, पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे कारण पुढे करीत त्यांनी हे काम बंद केले होते.
राज्यात सत्ता पालट होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हे काम पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्यावर ते सुरू झाले आहे.
हेच काम पुढे नेण्यासाठी आणखी ८४ झाडांची तोड करण्याची आवश्यकता असल्याने त्याबाबत चे प्रकरण मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणासमोर होते , यामुळे या कामाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
ही याचिका आज फेटाळून लावत न्यायालयाने मुंबई महापालिकेला वृक्ष तोडीबाबत रीतसर निर्णय घेण्यास सांगितले असून मेट्रो कार शेड चे काम स्थगित होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ML/KA/PGB
29 Nov .2022