घृणास्पद कृत्य -आश्रमातील अल्पवयीन मुलींवर संचालकाकडून बलात्कार
नाशिक,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधार आश्रमात राहणाऱ्या सहा अल्पवयीन मुलींवर संचालकानेच बलात्कार केल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे.
सुरुवातीला आश्रमातील एका पीडित मुलीने संचालकाने अत्याचार केल्याची बाब आपल्या आई वडिलांना सांगितली होती. त्यावरून आई-वडिलांनी पीडित मुलीसह म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पीडित मुलीने फिर्याद दिल्यावर म्हसरूळ पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेत चौकशी सुरू केली होती. यावरून संचालक हर्षल मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. Heinous act – Rape of minor girls Nashik Adhar Ashram
अॅट्रोसिटीसह पोक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामध्ये तपास करत असतांना त्याने आणखी पाच अल्पवयीन मुलींवर शारीरिक अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेनं पोलीसांनी कठोर पाऊले उचलून अधिकचा तपास सुरू केला आहे.
28 Nov. 2022